मनसेनंतर आता शिवसेनेचाही नाना पाटेकरांना पाठिंबा

0
483

मुंबई, दि.३ (पीसीबी) – अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या गैरवर्तणुकीच्या आरोपानंतर या प्रकरणाची चर्चा कलाविश्वाप्रमाणेच राजकारणातही रंगू लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तनुश्रीच्या या बेताल वक्तव्याचा निषेध करत नानांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता शिवसेना पक्षानेही नाना पाटेकरांना पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे.

‘तनुश्रीने नाना पाटेकरांवर आरोप केल्यानंतर अनेकांनी तिला पाठिंबा दिला. मात्र नानांची बाजूदेखील ऐकून घेणे तितकेच महत्वाचे आहे. नाना केवळ एक अभिनेताच नाही तर देशातील एक प्रतिष्ठित व्यक्तीदेखील आहेत’, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पुढे ते असेही म्हणाले, ‘नाना पाटेकर एक सद्गृहस्थ व्यक्ती असून ते कसे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. सध्या नाना या प्रकरणावर फार काही बोलत नाहीयेत. मात्र त्यांनी तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. यावरुनच ते दोषी आहेत की नाही हे समजते. जर ते दोषी असते तर त्यांनी नोटीस पाठविलीच नसती’.