पिंपळेसौदागर येथील सामुहिक क्षमावाणी पर्व २०१८ कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद  

0
543

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – दिगंबर जैन समाजाच्या वतीने पिंपळेसौदागर येथील शिवांता हॉलमध्ये मंगळवारी (दि. २) “सामुहिक क्षमावाणी पर्व २०१८” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमारे २०० ते २५० जैन बांधवानी सहभाग नोंदवला होता.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, सदस्य रितेश जैन, मनीष जैन, राहुल जैन, सौरभ जैन,रोहित राफन यांच्यासह व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान,   नगरसेवक काटे यांच्या हस्ते गणेशोत्सव काळात “दिगंबर जैन समाज पिंपळे सौदागर” च्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा कार्यक्रमांमधील विजयी स्पर्धकांचा पारितोषिक वितरण करण्यात आले.