मजुराला सापडले हिरे; रातोरात झाला लखपती…घडले असे काही

0
370

मध्यप्रदेश,दि.२४(पीसीबी) – कुणाचे नशीब कधी चमकेल याचा काही नेम नाही. खोदकाम करता करता मध्य प्रदेशातील पन्ना जिह्यातील एका मजूराला एकाच दिवशी दोन मौल्यवान हिरे सापडले आहेत. बाजार भावानुसार या हिऱयांची किंमत 35 लाख रुपयांच्या आसपास आहे.

मध्य प्रदेशचा पन्ना जिल्हा हिऱयांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. येथील एका गावात खोदकाम सुरू होते. यावेळी इटवा गावातील रहिवासी भगवानदास पुशवाह आणि त्यांच्यासोबत काम करणाऱया मजूरांना खोदकाम करताना काहीतरी चमकताना दिसले. त्यांनी निरखून पाहिल्यानंतर ते हिरे असल्याचे लक्षात आले. सापडलेले हिरे 7.94 कॅरेट आणि 1.93 कॅरेटचे आहेत.

हिरे सापडल्यानंतर ते प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे. या हिऱयांचा लिलाव झाल्यानंतर त्यातून जमा झालेले पैसे सरकारी कर कपात करून उरलेले पैसे या मजुरांना दिले जाणार आहेत. या हिऱयांमुळे आमचे नशीब चमकले आहे. मिळालेल्या पैशांतून आमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, कर्ज फिटेल असे भगवानदासने सांगितले आहे.