भोसरीत लग्नाच्या अमिषाने महिलेवर बलात्कार

0
555

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – लग्नाचे अमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचप्रमाणे संबंधिताविरूद्ध तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता तिला धमकाविण्यात आले. २१ जून २०१३ ते जून २०१९ या कालावधीत दर्यापूर, अमरावती आणि भोसरी येथे ही घटना घडली आहे.

पीडित ३७ वर्षीय महिलेने याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गजानन शामराव धोटे (वय ४७, रा. पिंपळ खुटा, ता. मंगळूपिर, जि. वाशिम) आणि शारदा सुलखनसिंग सोडी (वय ४७, कृष्णा अपार्टमेंट, शिवाजी चौक, साई चौक, नवी सांगवी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने गजानन याने फिर्यादी महिला ही त्यांची कायदेशीर पत्नी नाही हे माहित असूनही लग्नाचे अमिष दाखविले आणि वारंवार जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्याचप्रमाणे महिलेसोबत राहून समाजाला पत्नी असल्याचे भासविले. त्यामुळे त्याच्याविरूद्ध तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता आरोपी सोडी हीने संबंधिम महिलेच्या कौटूंबिक परिस्थितीचा गैरफायदा घेवून धमकाविले आणि विवाहबाह्य संबंध ठेवण्यास भाग पाडले. भोसरी पोलिस ठाण्याकडून हा गुन्हा झिरो नंबरने अमरावती जिल्ह्याकडे वर्ग करण्यात आला आहे.