भोसरीत बोलत नसल्याच्या कारणावरुन तरुणाने तरुणीच्या कानशिलात लगावली; तरुणास अटक

0
597

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – “तु माझ्याशी का बोलत नाहीस”, अशी विचारणा करुन एका तरुणाने तरुणीच्या कानशिलात लगावून तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवार (दि.११) दुपारी तीनच्या सुमारास भोसरी लांडेवाडी येथील वात्सल्या हॉस्पीटल शेजारी घडली.

याप्रकरणी पिडित तरुणीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, विनोद लक्ष्मण जाधव (वय २२, रा. शांतीनगर गल्ली क्र.२, भोसरी) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दुपारी तीनच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर तक्रारदार महिलेची मुलगी घरी निघाली होती. यावेळी आरोपी विनोद याने तिचा रस्ता आडवून, “तु माझ्याशी का बोलत नाहीस”, अशी विचारणा केला. यावर मुलीने मला बोलायचे नाही असे उत्तर दिले. यामुळे रागावलेल्या विनोद याने, “तु माझ्याशी कशी बोलत नाही हे बगतोच”, असे बोलून मुलीच्या कानशिलात लगावून पसार झाला. याप्रकरणी भोसरी पोलीसांनी विनोद याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक टोके तपास करत आहेत.