आदित्य ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ?

0
542

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून  दिली जात आहे. उत्तर मध्य मुंबईतून आणि उत्तर पश्चिममधून आदित्य ठाकरे लोकसभा  लढवतील, अशी चर्चा सुरु  झाली आहे.

उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ भाजपकडे आहे. तर उत्तर पश्चिम हा शिवसेनेकडे आहे. उत्तर मध्य मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन खासदार आहेत. तर उत्तर पश्चिममध्ये गजानान कीर्तीकर खासदार आहेत. हे दोन्ही मतदारसंघ सेफ आहेत, त्यामुळे या दोन्ही पैकी एका मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे.

दरम्यान, ठाकरे कुटुंबातील आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीने निवडणूक लढवलेली नाही. आदित्य ठाकरे मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या निवडणुकीत  विजयी झाले आहेत. आदित्य  यांनी युवासेनेचे अध्यक्षपदही समर्थपणे सांभाळले आहे.  तरुणींना सेल्फ डिफेन्सचे धडे, शाळांमध्ये व्हर्च्यूअल क्लास रुम, ओपन जिम,   मुंबईत स्वच्छ शौचालय ही कामे आदित्य यांच्या नेतृत्वाखाली चांगली लोकप्रिय झाली आहेत.