‘जी’ विधानावर पोरकट राजकारण करण्यापेक्षा ठगांबद्दल बोला; धनंजय मुंडेंचा भाजपला टोला

0
647

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘जी’ विधानावर पोरकट राजकारण करण्यापेक्षा ठगांबद्दल बोला, असा टोला  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपला  लगावला आहे.

राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात बोलताना  कुविख्यात दहशतवादी मसूद अजहर याचा उल्लेख `मसूद अजहरजी’  असा केला होता.  यावर भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधींच्या विधानाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. याबद्दल मुंडे यांनी  भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.

मुंडे पुढे म्हणाले की, भाजपने नीरव मोदी, मल्ल्या, चौकसी यांच्यासारखे ठग भारतात होते, तेव्हा त्यांची ‘हा जी, बोला जी’ म्हणत चाकरी केली. आता भारताबाहेरही त्या कर्जबुडव्यांना मदत करत आहेत. ‘जी’ वक्तव्याचे पोरकट राजकारण करण्यापेक्षा ठगांबद्दल बोला,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.