भोसरीत धारदार हत्याराने वार करुन तरुणाचा खून

0
3415

भोसरी, दि. २४ (पीसीबी) – धारदार हत्याराने वार झालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह भोसरी येथील वाळके मळ्याजवळ आढळून आला आहे. ही घटना रविवारी (दि. २३) सकाळी उघडकीस आली. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.

याप्रकरणी भोसरी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे वय अंदाजे २५ वर्ष असून त्याचा खून अंदाजे दोन तीन दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्यता आहे. त्याने अंगात बर्मुडा घातलेला आहे. त्याच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार हत्याराचे वार आहेत.  आरोपींनी खून केल्यानंतर मृतदेह भोसरी येथील वाळके मळ्याशेजारी असलेल्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या खाली टाकून दिला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यकत केला आहे.  भोसरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गाडे तपास करत आहेत.