भोसरीत एकाचे अपहरण करुन मारहाण; शिक्षिकेसह दोघांविरोधात गुन्हा

0
435

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – तीन लाख रुपये उसने द्यावेत म्हणून तिघांनी मिळून एकाचे अपहरण करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना मंगळवार (दि.४) जून जय गणेश साम्राज्य आणि राजगुरूनगर येथे घडली.

याप्रकरणी लक्ष्मण जिजाबा वाडेकर (वय ४५, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष भानुदास बोरकर (वय ४२), शिक्षिका सुवर्णा संतोष बोरकर (वय ३७, दोघे रा. जय गणेश साम्राज्य, इंद्रायणीनगर, भोसरी) आणि एक अनोळखी इसम या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी जखमी लक्ष्मण यांनी आरोपींच्या मुलाबरोबर अश्लील वर्तन केले होते. त्यानंतर पॉलिसीच्या पैशांच्या कारणावरून आरोपींनी लाथाबुक्क्यांनी लक्ष्मण यांना मारहाण केली. तर सुवर्णा यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. यानंतर लक्ष्मण यांना जबरदस्तीने वाहनात बसवून त्यांना तीन लाख रुपये उसने मागितले. त्यासाठी लक्ष्मण यांनी नकार दिला असता आरोपींनी लक्ष्मण यांना त्यांच्या राजगुरूनगर येथील घरी नेऊन मारहाण केली.  भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.