भोसरीतील सागर फुगे यांची भाजप युवा मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी निवड

0
799

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – भोसरी येथील सागर फुगे यांची पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप तसेच युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवि लांडगे यांच्या हस्ते सागर फुगे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रभाग स्वीकृत सदस्य वैशाली खाडे, बाळासाहेब वाघेरे, शहर उपाध्यक्ष गणेश जवळकर, विवेक महाजन, क्रीडा सेलचे शहराध्यक्ष आदी उपस्थित होते.