भोसरीतील लांडगे आळी दोन दिवसांपासून अंधारात

0
371

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पहिल्या पावसाने झटका दिला आणि गेले दोन दिवसांपासून भोसरी गावठाणातील लांडगे आळी, हनुमान मंदिर परिसरातील दोनशेवर घरांची लाईट गूल झाली. महाविकरणच्या अधिकारी, कर्मचाऱी आणि कार्यालयात वारंवार फोन करून नागरिकांना प्रतिसाद मिळत नसल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

वादळी पावसाने शहराचा अर्धा भाग अंधारात गेला. असंख्य झाडे पडली, होर्डिंग्ज कोसळली. त्यामुळे कित्येक ठिकाणी वीज गेल्याच्या तक्रारी आहेत. तत्पूर्वी भोसरीच्या लांडगे आळीतील वीज गेली, पण महावितरणचे लोक तिकडे पहायला तयार नाहीत. वीज नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्याच्या समांतर डीपी बाक्स असल्याने पाऊस झाला की तिथे पाणी साठते आणि वीज जाते, त्याबाबत वारंवार तक्रार केली आहे. अधिकारी लक्ष देत नसल्याने दरवर्षी हा प्रश्न निर्माण होतो, असे नागरिकांनी सांगतिले.

महावितरणला साहित्य मिळत नसेल तर प्रसंगी लोकवर्गणी काढून पैसे देऊ, पण वीज आली पाहिजे असा नागरिकांचा पवित्रा आहे. अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरावेल लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.