निसर्ग चक्रीवादळाचा पुण्यात तांडव

0
499

पिंपरी, दि. 4 (पीसीबी): कोरोनाच्या संकटाला प्रत्येक जण सामोरे जात असताना काल मात्र महाराष्ट्रा पुढे एक मोठे संकट आले, ते म्हणजे निसर्ग चक्रीवादळाचे. वादळ दुपार पर्यंत मुंबईच्या किनार पट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज सांगण्यात आला होता, परंतु काही तासांपूर्वीच या वादळाने आपला रस्ता बदलत पुण्याच्या दिशेने वाट धरली. या वादळाने पुण्यातील शहरी भागात मोठ्या प्रमाणात झाडपडीच्या घटना घडल्या तर अर्ध्याहुन अधिक शहराची वीज या वादळामुळे खंडित झाली होती. जिल्हा पूर्व पदावर करण्यास प्रशासन कामला लागले आहे.अनेक ठिकाणी विजेचे पोल पडले तर अनेक ठिकाणी रोहित्रे(ट्रान्सफारमर) जळली. अश्या प्रकरच्या संकटाला पुण्याला सामोरे जावे लागले परंतु शहरी भागात फक्त झाडपदीच्या सारख्या घटना घडल्या असल्या तरी ग्रामीण भागात शेतकरी मात्र संपूर्ण हतबल झाला आहे. मावळ असेल जुन्नर असेल,आंबेगाव,अश्या प्रकारच्या भागात शेतीचे प्रमाण जास्त आहे. चक्रवादळ देखील याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय पाहायला मिळालं आहे.

शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला या निसर्गाचा फटका पडला आहे. त्याच बरोबर कच्ची घरे असलेल्यांच्या डोक्यावरील सहारा उडाला आहे. किती नुकसान झाले कुणाची किती घरे पडली याचा प्रशासन अभ्यास करत असून येत्या काही दिवसात त्याचा आकडा समोर येईल.आता जे चित्र पाहायला मिळत आहे ते पाहून नक्कीच प्रत्येकाचे डोळे पानावणारे आहे हे नक्की. एका परिवाराच्या अंगावर घरातील छत पडल्याने संपूर्ण परिवार जख्मी झाले. त्यामधील एकाला जीव देखील गमवावा लागला आहे.

जर शेतीचा विचार केला तर करोडो रुपयांचे नुकसान या अन्नदात्याला झाले आहे.कोरोनामुळे आधीच हवालदिल झालेला शेतकरी आता या चक्रीवादळामुळे संपूर्ण पणे मोडला गेला आहे. शेतकऱ्याने शेतातुन काढलेला कांदा व इतर पिके पावसात झोडपून निघाली आहे. संपूर्ण पीक खराब झाली आहे.,पपई ,केळी द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले याच बरोबर मावळ भागात फुल उत्पादक देखील काहीं प्रमानात आहेत. या मध्ये फुल उत्पादकाचे तर संपूर्ण फुल हातातून गेली आहे.

शेतकऱ्याने शेतातुन काढलेला कांदा व इतर पिके पावसात झोडपून निघाली आहे त्यामुळे संपूर्ण पीक खराब झाली आहे.पपई ,केळी द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. याच बरोबर मावळ भागात फुल उत्पादक देखील काहीं प्रमानात आहेत. या मध्ये फुल उत्पादकाचे तर संपूर्ण फुल हातातून गेली आहे.