दहशतवाद्यांना मदत करणे थांबवा; अमेरिकेचा पाकिस्तान, चीनला इशारा

0
914

वॉशिंग्टन, दि. २० (पीसीबी) – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना आश्रय देऊ नका. तसेच त्यांना मदत करणे थांबवा, असा इशारावजा सल्ला अमेरिकेने पाकिस्तान आणि चीनला दिला आहे. संयुक्त राष्ट्र संघातील आपापल्या जबाबदाऱ्या निभवा, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने  जाहीर केलेले दहशतवादी पाकिस्तानमध्ये आश्रय घेत आहेत. तर चीन   मित्रराष्ट्र असलेल्या पाकिस्तानला पाठीशी घालत आहे. यामुळे अमेरिकेचा हा डोस महत्त्वाचा मानला जात आहे. पाकिस्तानच्या कुरापती आणि चीनचे आडमुठे धोरण या पार्श्वभूमीवरच अमेरिकेने हा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेले दहशतवादी पाकिस्तानमध्ये आश्रय घेत  आहेत, हे सिध्द झाले आहे. तर दुसरीकडे चीन पाकिस्तानला पाठीशी घालत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा हा सल्ला महत्त्वपूर्ण मानला जात आहे.