भारताच्या एअर स्ट्राइकचे फोटो पाकिस्तानकडून प्रसिध्द

0
607

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाने  पाकिस्तानच्या सीमा भागात घुसून  आज (मंगळवार) पहाटे कारवाई केली. वायुदलाच्या१२ मिराज २००० विमानांनी पीओकेमध्ये दहशतवाद्यांचे  मोठे तळ  उद्धवस्त केले . या कारवाईचे फोटो  पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी शेअर केले आहेत. यामध्ये भारतीय वायुदलाच्या हल्ल्य़ाचे शेल दिसून येत आहे.

भारताने १ हजार किलो बॉम्ब फेकले.  या हल्ल्यात  दहशतवाद्यांचे अनेक  तळ उद्‌ध्वस्त झाले आहेत.   भारतीय वायुदलाने आज पहाटे ३.३० वाजता  ही कारवाई केली आहे.   हवाईदलाच्या १२  विमानांनी ही कारवाई केली. पठाणकोट एअरबेस आणि मध्य भारतातून हवाईदलाच्या विमानांनी उड्डान केले. मिराज २००० या विमानांनी पाकिस्तानी रडारला चकवा देत ही कारवाई केली.

मुजफ्फराबाद, चकोटी, बालाकोटमध्ये भारतीय दलाने दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले चढवले. यात जैशचे  अनेक तळ उद्‌ध्वस्त झाले आहेत. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या कारवाईनंतर पाकिस्तानने राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर  फायरिंग सुरू केली. अनेक ठिकाणी मोर्टार टाकले.