भाजप स्वतःच्या थोबाडावर आपटला आहे; संदीप देशपांडेंचा टोला

0
516

मुंबई, दि. ४ (पीसीबी) –  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारसभा घेतल्या होत्या. याप्रकरणी निवडणूक आयोगाने मनसेला नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये  आयोगाने मान्य केले आहे की, राजसाहेबांनी कुठल्याही उमेदवाराचा प्रचार केलेला नाही.  त्यामुळे भाजप स्वतःच्या थोबाडावर आपटला आहे, असा टोला  मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी  लगावला आहे.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात १०  प्रचारसभा  घेऊन भाजपविरोधात रान पेटवले होते. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. भाजपने राज ठाकरेच्या प्रचारसभांचा खर्च कोण करत आहे, असा प्रश्न केला होता. प्रचारसभांच्या खर्चाचा तपशील राज ठाकरेंना निवडणूक आयोगाला द्यावा लागणार आहे.

मनसेचा एकही उमेदवार लोकसभेसाठी उभा  केला नसल्याने तसेच मनसेने कोणत्याही उमेदवाराचा प्रचार केला नसल्याने त्यांच्या सभांचा खर्च गृहीत धरावा का? असे प्रश्न उपस्थित  केले जात होते.  दरम्यान, राज ठाकरे यांना यासंदर्भातील नोटीस पाठवण्यात आली आहे. ९० दिवसांच्या आत राज यांना आपल्या सभांच्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाला द्यावा लागणार आहे.