भाजप-सेनेने आता जमिनीवर उतरावे; विधानसभेत आघाडीचाच विजय होणार – धनंजय मुंडे

0
386

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – महापालिका पोटनिवडणुकीत आघाडीची सरशी पहायला मिळत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळालेल्या विजयानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सेना-भाजपवर निशाणा साधला. लोकसभेच्या विजयानंतर धुंदीत असलेल्या भाजप-सेनेने आता जमिनीवर उतरावे. हवा बदलतेय, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित जागा मिळवता आल्या नाहीत. परंतु या पराभवानंतरही महापालिका पोटनिवडणुकीत मात्र आघाडीची सरशी पहायला मिळत आहे. याचदरम्यान धनंजय मुंडे यांनी सेना-भाजपवर निशाणा साधला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. लोकसभेच्या विजयानंतर धुंदीत असलेल्या भाजप-सेनेने आता जमिनीवर उतरावे. हवा बदलतेय, सर्वसामान्य जनतेचा कौल बदलतोय, असे मुंडे यांनी म्हटले.

इतकेच नव्हे तर आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्या विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडीचाच विजय होणार आहे आणि राज्यात परिवर्तन होणार आहे, असेही मुंडे यांनी म्हटले.