…तर मिशा काय भुवया सुद्धा ठेवणार नाही – उदयनराजे भोसले

0
391

सातारा, दि. २४ (पीसीबी) – साताऱ्यात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या आणि त्या निवडणुकीत जर पडलो तर मिशा काय भुवया सुद्धा ठेवणार नाही, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले, मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसचा परभव झाला. भाजप- सेना महायुतीने दणदणीत विजय मिळवला त्यानंतर विरोधकांकडून ईव्हिएम मुळेच भाजप लोकसभा निवडणूक जिंकली असा आरोप करण्यात आला. इतकेच नव्हे तर विरोधकांकडून ईव्हिएमवर आक्षेपही घेणात आला. तसेच आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

याचदरम्यान राष्ट्रवादीचे नेते, खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत ईव्हिएमवर आक्षेप घेतला. इतकेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत जितके मतदान झाले तितके मतदान यायला हवं, तेवढ मतदान आलं नाही. मतदान इतका आकडा येत नाही, असे उदयनराजे यांनी म्हटले. तसेच सातारा लोकसभा मतदार संघात पुन्हा निवडणूक घ्या आणि ती बॅलेट पेपरवर घ्या असेही ते म्हणाले, आणि त्या निवडणुकीत जर मी पडलो तर मिशा काय भुवया सुद्धा ठेवणार नाही, असे आवाहनही त्यांनी निवडणूक आयोगाला दिले.