माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा बंगला पा़डण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश

0
525

नवी दिल्ली, दि, २४ (पीसीबी) – आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू रहात असलेली इमारत पाडण्याचे आदेश मुख्यमंत्री  जगन मोहन  रेड्डी यांनी आज दिले आहेत. तसेच राज्य सरकारने या बंगल्याचा ताबाही घेतला आहे. पुढील आठवड्यात ही इमारत पाडण्यात येणार आहे.

माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे अमरावतीमधील प्रजा वेदिका या इमारतीत राहात होते. टीडीपी सरकारने प्रजा वेदिका इमारतीची निर्मिती आंध्रप्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून करण्यात आले होती. परंतु आता ही इमारत पाडण्यात येणार आहे. टीडीपीने याला घटनेला द्वेषाचे राजकारण म्हटले आहे. विरोधकांचा आरोप आहे की, सरकारने माजी मुख्यमंत्र्यांविषयी सद्भावना दाखवली नाही. तसेच त्यांचे सामान घराच्या बाहेर फेकून दिले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नायडू यांनी ही इमारत विरोधीपक्ष नेत्याला द्यावी ही विनंती केली होती. मात्र सरकारने त्यांची विनंती फेटाळून लावली आहे.