भाजपशी आजवर दगाबाजी नाही; परंतु चुकल्यास खडेबोल – ठाकरे

0
353

सोलापूर, दि. १६ (पीसीबी) –  गेल्या पाच वर्षांत राज्यात महायुती सरकारचा कारभार चालत असताना जे चांगले वाटले, त्याला मनापासून साथ दिली आणि ज्या गोष्टी पटल्या नाहीत, त्याला विरोध केला. भाजपला कधीही दगा देण्याचा प्रयत्न केला नाही. यापुढेही सत्तेत भाजपच्या जर काही गोष्टी पटल्या नाहीत तर त्याबद्दल कोणताही मुलाहिजा न ठेवला उघडपणे खडेबोल सुनावण्याची ताकद शिवसेना बाळगून आहे, असे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापुरात स्पष्ट केले.

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांच्या प्रचारार्थ कर्णिकनगरातील मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. या सभेसाठी हजारोंचा जनसुदाय हजर होता. या सभेस सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख, जलसंधारणमंत्री प्रा. तानाजी सावंत, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, शिवसेनेचे समन्वयक मिलिंद नार्वेकर, भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, सेनेचे उमेदवार दिलीप माने आदी उपस्थित होते.

या वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस समाचार घेताना सोबत शिवसेनेच्या बंडखोरांचाही बंदोबस्त करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.