PMC बँकेच्या आणखी एका खातेधारकाचा मृत्यू

0
365

मुंबई, दि.१६ (पीसीबी) – गेल्या दोन दिवसांत या बँकेच्या दोन खातेधारकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने या संकटाला वेगळेच वळण लागले आहे.

२४ तासही उलटत नाहीत तोच आज दुपारी मुलुंड येथील ६१ वर्षीय खातेधारक फट्टोमल पंजाबी यांना मृत्यूने गाठले. बँकेवरील निर्बंधांमुळे प्रचंड तणावाखाली असलेल्या फट्टोमल यांना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या गोकुळ रुग्णालयात नेले मात्र तिथे तपासणी केली असता त्यांचे आधीच निधन झाल्याचे स्पष्ट झाले. फट्टोमल हे आज बँकेत जाण्यासाठी निघाले असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले. फट्टोमल यांना विकास आणि गीता (विवाहित) अशी दोन मुले असून मार्च महिन्यात पत्नीचे निधन झाल्यानंतर ते घरात एकटेच राहत होते, असे त्यांचे बंधू दीपक पंजाबी यांनी सांगितले. यांच्या खात्यात ८ ते १० लाख रुपये होते. ही त्यांच्या आयुष्याची कमाई होती, अशी माहिती गुरीज्योत सिंग यांनी दिली.