अलिकडचे लबाड कोल्हे म्हणजे अमोल कोल्हे; चंद्रकांत पाटलांची टीका

0
373

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या शरद पवार नावाचे एकच कार्यकर्ते शिल्लक राहिले आहेत. त्या पक्षात इतर सर्व नेतेच आहेत. अलिकडेच त्यांना शिवसेनेने भेट दिलेले लबाड कोल्हे म्हणजे अमोल कोल्हे, हे दोनच वक्ते उरले आहेत,” अशी खरमरीत टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. कोल्हापुरात आयोजित सभेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता शरद पवार नावाचे एकच कार्यकर्ते शिल्लक असून बाकी सर्व नेते आहेत. त्यातच त्यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्याने एक भेट दिली आहे ते म्हणजे अमोल कोल्हे. त्यांना सिनेनट म्हणून पहायला अनेक जण येतात. असे केवळ दोनच वक्ते त्यांच्याकडे असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला. अनेर लबाड कोल्हे शिवसेनेमध्ये मोठे होऊन, शिवसेनेशी गद्दारी करून निघून गेले, त्यातलेच हे एक लबाड कोल्हे म्हणजे अमोल कोल्हे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

येत्या पाच दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी काही घडामोड घडली तर कोणीही आश्चर्य वाटून घेऊ नये. या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये १०० टक्के फुट पडणार असल्याचा दावाही पाटील यांनी यावेळी केला. परंतु फुट पडण्यासाठी जास्त लोकं निवडून यावी लागतील. परंतु केवल वीसच लोकं निवडून आली तर फुट काय पडणार? असा सवालही त्यांनी यावेळी केला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेची पाठराखणही केली. गेल्या पाच वर्षांमध्ये एकदाही शिवसेनेने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नसल्याचंही पाटील म्हणाले.