भाजपप्रवेशासाठी नव्हे, यासाठी राधाकृष्ण विखेंची भेट घेतली – काँग्रेस आमदार

0
618

बुलढाणा, दि. ५ (पीसीबी) – मी राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली हे खरे आहे. मात्र,  मी भाजपमध्ये  जाण्यासाठी नव्हे, तर त्यांनी काँग्रेस सोडू नये, म्हणून मी त्यांची भेट घेतली,  असा खुलासा बुलढाण्याच्या चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी  केला आहे.

आमदार राहुल बोंद्रे यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर बोंद्रे म्हणाले की, मी भाजपमध्ये जाणार नाही, मी काँग्रेसमध्येच राहणार आहे,  असे स्पष्ट करून त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  त्यांच्या सोबत काँग्रेसचे अब्दुल सत्तार, जयकुमार गोरे, भारत भालके, गोपालदास अग्रवाल आणि सुनिल केंदार  भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही आमदारांनी विखे -पाटील यांची भेट घेतली आहे.