भाजपचे ३० आमदार काँग्रेसच्या संपर्कात; कमलनाथ यांचा दावा  

0
544

इंदोर, दि. १७ (पीसीबी) – मध्यप्रदेशमधील सत्तारूढ भाजपचे ३० आमदार काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, असा दावा मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी आज (सोमवार) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.