लोकसभेसाठी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर  

0
785

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने  महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यात पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा  करण्यात आली आहे.  काँग्रेसने चंद्रपूरमध्ये विनायक बंगाडे, जालन्यात विलास औताडे, औरंगाबादमध्ये सुभाष झांबड, भिवंडीत सुरेश टावरे आणि लातूरमध्ये मच्छिंद्र कामनात यांना उमेदवारी  दिलेली आहे.

या यादीत काँग्रेसने अद्यापही पुण्याचा उमेदवार जाहीर केलेला नाही. औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आलेली नाही. या जागेवर काँग्रेसचा उमेदवार दिलेला आहे.

राज्यातील मतदारसंघ आणि उमेदवार –

नंदुरबार – के. सी. पडवी

धुळे – कुणाल रोहिदास पाटील

वर्धा – चारुलता टोकस

मुंबई दक्षिण मध्य – एकनाथ गायकवाड

यवतमाळ-वाशिम – माणिकराव ठाकरे

शिर्डी- भाऊसाहेब कांबळे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग – नवीनचंद्र बांदिवडेकर

नागपूर – नाना पटोले

सोलापूर – सुशीलकुमार शिंदे

मुंबई उत्तर-मध्य – प्रिया दत्त

मुंबई दक्षिण – मिलिंद देवरा

गडचिरोली-चिमूर – डॉ. नामदेव उसेंडी

चंद्रपूर- विनायक बंगाडे

जालना- विलास औताडे

औरंगाबाद- सुभाष झांबड

भिवंडी – सुरेश टावरे

लातूर- मच्छिंद्र कामनात