भागुबाई देवकाते यांचे वृध्दापकाळाने निधन

0
667

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष गणपत देवकाते यांच्या मातोश्री स्व. भागुबाई गणपत देवकाते यांचे सोमवारी (दि.१९) वृध्दापकाळाने निधन झाले. त्या १०५ वर्षांच्या होत्या.

भोसरी येथील यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेत आणि वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी गोरगरीब मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून बरेच कष्ट घेतले होते. यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.