खूनाच्या प्रयत्नातील दोघा आरोपींना मामुर्डीतून अटक

0
765

मामुर्डी, दि. २३ (पीसीबी) – खूनाचा प्रयत्न करुन फरार झालेल्या दोघा आरोपींना गुन्हे शाखा युनिट-२ च्या पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.२२) मामुर्डी येथील तरस यांच्या वाड्यासमोर करण्यात आली.

राहुल उर्फ पापा नितीन भोसले (वय ३०) आणि सॅमसन उर्फ छोटू अँथोनी पॉल झेवीयर (वय २६, दोघे. रा. साईनगर, मामुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस पथक तळेगाव पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर होते. यावेळी पोलीस हवालदार प्रविण दळे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, खूनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी साईनगर मामुर्डी येथे येणार आहे. पोलीसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी राहुल भोसले आणि छोटू झेवीयर या दोघांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी तळेगाव पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा केल्याचे कबुल केले. त्या दोघांविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दोघा आरोपींना तळेगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.