भागवतांचे आभार मानणाऱ्या काँग्रेसच्या फलकाची चर्चा

0
381

चंद्रपूर, दि. २५ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिल्लीतील कार्यक्रमात काँग्रेसच्या कार्याचे कौतुक केल्यानंतर चंद्रपूर जिल्हा-शहर काँग्रेस समितीने गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरातील प्रमुख चौकात भागवतांचे आभार मानणारे फलक लावले आहेत. या फलकाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले असून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.