क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकांनी स्वतःला आवर घालावा – सौरव गांगुली

0
595

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – आशिया चषक स्पर्धा ही सध्या अंतिम टप्प्यात आहे. भारताने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. तर अंतिम फेरीतील दुसरा संघ आजच्या सामन्यानंतर ठरणार आहे. भारताने इंग्लंड दौऱ्यात फारशी समाधानकारक कामगिरी केली नाही. परंतु आशिया चषक स्पर्धेत भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ज्याप्रमाणे इंग्लड दौऱ्यातील खराब कामगिरीसाठी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जबाबदार धरले जात होते, तसेच आशिया कप स्पर्धेतील चांगल्या कामगिरीबाबत शास्त्री यांनी पाठ थोपटणे गरजेचे आहे. पण या सर्व बाबींमध्ये माजी कर्णधार सौरव गांगुली याने एक विधान केले आहे.

क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकांनी स्वतःला आवर घातला पाहिजे, असे सूचक विधान त्याने केले आहे. फुटबॉल आणि क्रिकेट हे दोन वेगवेगळे खेळ आहेत. हल्लीच्या क्रिकेट प्रशिक्षकांना आपण फुटबॉल संघाचे प्रशिक्षक असल्यासारखे वाटते. ते प्रशिक्षक जसे सामन्यादरम्यान आक्रमक होतात, तसेच काहीसे करण्याचा विचार हल्लीच्या क्रिकेट प्रशिक्षकांचा असतो. पण क्रिकेट हा कर्णधाराचा खेळ आहे, हे प्रशिक्षकाने लक्षात ठेवायला हवे आणि सामना सुरु असताना स्वतःला आवर घालायला हवा, असे गांगुली म्हणाला.