भंडाऱ्यात अनैतिक संबंधांमुळे विवाहित प्रेमीयुगुलाची धिंड; दहा जणांविरोधात गुन्हा

0
1361

भंडारा, दि. ३ (पीसीबी) – अनैतिक संबंध असलेल्या विवाहित प्रेमीयुगुलाची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोंढा गावात घडला. ही घटना रविवारी (दि.२) रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांच्या संबंधांची गेले काही दिवस गावात चर्चा होती. या संबंधांवरुन त्यांच्या नातेवाईकांनी असे न वागण्याबद्दल दोघांना समजावलेही होते. तरीही त्यांचे प्रेमसंबंध सुरुच होते. मात्र, रविवारी  ही महिला अचानक संबंधीत पुरुष व्यक्तिच्या घरी आली. तसेच, तिने आम्हाला पती-पत्नीप्रमाणे सोबत राहायचे आहे, असे सांगायला सुरुवात केली. त्यामुळे त्या पुरुषाचे नातलग प्रचंड संतापले आणि मोठा भाऊ, धाकटा भाऊ, त्यांची पत्नी, वडिलांनी त्या दोघांना हातगाडीच्या रिक्षात गावात धिंड काढली. दरम्यान, प्रकारानंतर संबंधीत पुरुषाने आढ्याळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आढ्याळ पोलीस तपास करत आहे.