वाशीममध्ये मुख्यमंत्री, उध्दव ठाकरे यांनी नगारा वाजवून दिले युतीचे संकेत

0
634

वाशिम, दि. ३ (पीसीबी) – वाशिममधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगाऱ्याचे वादन केले. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत   शिवसेना आणि भाजप यांची युती होण्याची चर्चा  राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.   

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज मंदिर परिसरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी दोघांनीही वंजारा समाजाचे पारंपरिक वाद्य नगाऱ्याचे वादन केले. यावेळी  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, रणजीत पाटील, मदन येरावार, संजय राठोड, दादाजी भुसे, भावना गवळी  आदी उपस्थित होते.

तर दुसरीकडे, यवतमाळ येथील ग्रीन रुमपासून कार्यक्रमस्थळापर्यंत मुख्यमंत्री  यांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीत प्रवास केला. प्रोटोकॉल मोडत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंसोबत बुलेट प्रूफ स्कॉर्पिओत एकत्र प्रवास केला. ग्रीन रुममध्ये उद्धव ठाकरे यांना भेटायला मुख्यमंत्र्यांसह सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे पोहोचल्या होत्या. परंतु कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा ताफा आणि गाडी सोडून उद्धव ठाकरेंच्या गाडीत बसून प्रवास करणे पसंत केले.