ब्राझीलमध्ये बेछूट गोळीबार; ६ महिलांसह एकूण ११ जणांचा मृत्यू

0
522

रियो, दि. २० (पीसीबी) – ब्राझीलच्या रियो येथील एका बारमध्ये रविवारी (दि.१९) मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास सशस्त्र हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये ६ महिलांसह एकूण ११ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाजवळ एका हल्लेखोराला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर बाइक आणि कारमध्ये आले होते. एकूणच ७ हल्लेखोरांपैकी एकास अटक करण्यात आली तर, ६ जण पसार झाले. अटकेत असलेल्या हल्लेखोराची सध्या कसून चौकशी केली जात आहे. हल्ल्यानंतर बार आणि परिसरात मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली. यातील अनेक जण आपल्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी आले होते. या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने अद्याप काहीही सांगितलेले नाही. त्याची कसून चौकशी केली जात आहे.