बेकायदेशीर दारू विक्री ; वाकड, निगडी, देहूरोड येथून चौघांना अटक

0
213

पिंपरी,दि.०५(पीसीबी) – विनापरवाना बेकायदेशीर दारू विक्री करणा-यांना पोलिसांनी अटक केली आहे. वाकड, निगडी, देहूरोड याठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून चौघांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.4) ही कारवाई करण्यात आली.

वाकड येथील कारवाईत जया सुरेश जठार (वय 40), माला अनिल गुंजाळ (वय 29, रा. म्हातोबानगर, वाकड) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळ 17 हजार किंमतीची देशी व विदेशी दारू आढळून आली. बेकायदेशीर विक्रीसाठी त्यांनी ती जवळ बाळगली होती.

निगडीतील ओटास्किम याठिकाणी केलेल्या कारवाईत राम साहेबराव साठे (वय 30, काळभोरनगर, ओटास्किम) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळ 15 लिटर हातभट्टीची तयार दारू आढळून आली.

देहूरोड परिसरात संपत बुधप्पा (वय 25, रा. तळवडे, हवेली) याला अटक करण्यात आली आहे. त्याने विक्री करण्यासाठी 7 हजार 800 रूपये किंमतीची रम, टॅगो, व्हिस्की व डिएसपी आदी दारू बेकायदेशीररित्या जवळ बाळगली होती.