बेकायदेशीररित्या मांसविक्रीसाठी घेऊन जाणा-यावर कारवाई; दोघांना अटक

0
278

पिंपरी,दि.14 (पीसीबी): बेकायदेशीररीत्या मांस विक्रीसाठी कारमधून घेऊन जाणा-या दोघांवर तळेगाव दाभाडे पोलिसांनी कारवाई केली आहे. यात 130 किलो मांस आणि एक कार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 13) पहाटे सोमाटणे टोलनाक्यावर करण्यात आली आहे.

सनी मोहन वाल्मिकी (वय 29), संदीप जगदीश लोहट (वय 39, दोघे रा. एम बी कॅम्प, देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई लक्ष्मण शामराव सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास आरोपी एम एच 14 / एच डब्ल्यू 8656 या कारमधून एका प्राण्याला जीवे मारून त्याचे मांस विक्रीसाठी घेऊन जात होते. सोमाटणे टोलनाक्यावर हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी कारमधून 13 हजार रुपये किमतीचे 130 किलो मांस आणि एक लाख 50 हजार रुपये किमतीची कार जप्त करत दोघांना अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.