बुधवार पेठेत अल्पवयीन मुलींकडून जबरदस्तीने वेश्यागमन करुन घेणाऱ्या सात जणांना अटक

0
469

पुणे, दि. २७ (पीसीबी) – बुधवार पेठेतील कुंटनखान्यात दोन अल्पवयीन मुलींकडून जबरदस्तीने वेश्यागमन करुन घेणाऱ्यांवर सात जणांना सामाजीक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एक बांगलादेशी आणि एक कर्नाटकीतील अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२६) सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली कि, बुधवार पेठेतील  डायमंड बिल्डींग, ९८४ येथील एका फ्लॅटमध्ये रुपा तमांग आणि चंदा तमांग या दोघींनी दोन अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने वेश्याआगमन करण्यासाठी आणले आहे. यावर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय पाटील तसेच सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस आणि फरासखाना पोलिसांनी संयुक्त रित्या बुधवार पेठेतील डायमंड बिल्डींग मध्ये छापा टाकला. यावेळी त्यांना एक बांगलादेशी आणि एक कर्नाटकातील अशा दोन अल्पवयीन मुली तेथे आढळल्या. त्यांनी त्यांची सुटका केली तसेच आरोपी रुपा तमांग, चंदा तमांग, संजिदा रुहूल अमीन मुल्ला, कुमार शेलवन, आलम हक, शांती, तसेच वेश्यागमन करण्यास आलेल्या ग्राहकाला असे एकूण ७ जणांना अटक केली.

पोलिसांनी त्यांच्यावर अनैतिक मानवी व्यापार, बालकांवर लैगिक अत्याचार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर सुटका करण्यात आलेल्या दोन्ही मुलींना महंमदवाडी, हडपसर येथील रेस्क्यु होम मध्ये ठेवण्यात आले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस अधिक तपास करत आहेत