बीड जिल्ह्यातील वांगी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील ११४ विद्यार्थ्यांना विषबाधा

0
465

बीड, दि. २७ (पीसीबी) – वांगी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील ११४ विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली आहे. ही घटना आज (गुरुवार) दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान बीड जिल्ह्यातील वांगी येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत मध्यान्ह भोजणात मटकीची उसळ देण्यात आली होती. भुक लागलेली असल्याने विद्यार्थ्यांनी ती पटपट खालली यामुळे काही वेळातच विद्यार्थ्यांना मळ मळ होऊन उलटी झाल्या. एकापाठोपाठ अनेक विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ, चक्कर येऊ लागली आणि पाहता पाहता शाळांमधील ११४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची चर्चा गावभर झाली. सर्व विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनातून जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.