झोपडपट्टींचे पंचनामे करून मदत देणार – गिरीश बापट

0
448

पुणे, दि. २७ (पीसीबी) –  मुठा कालव्याची भिंत कोसळल्याने आजूबाजूच्या ज्या झोपडपट्टी पाणी शिरले आहे, त्या भागातील पंचनामे करुन मदत दिली जाईल, असे आश्वासन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे.  

मुठा कालव्याची गेल्या काही वर्षांपासून दुरुस्ती टप्प्या-टप्प्याने केली जात आहे. मात्र, त्या ठिकाणी आज भराव खचल्याने कालवा फुटला, असे  गिरीश बापट यांनी सांगितले. मुख्य खडकवासला धरणातून पाणी बंद करण्यात आले आहे. हा कालवा १११ किलोमीटर लांबीचा आहे, असे त्यांनी सांगितले.

यंदा पुण्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. जवळपास ९० टक्के धरणे भरली आहेत. कोणताही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. कालवा फुटल्यामुले कोणताही पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे  बापट म्हणाले. झोपडपट्टी भागात पंचनामा करून मदत दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.