#बीड | कारला ट्रकची धडक, सात जणांचा जागीच मृत्यू

0
356

#बीड,(पीसीबी): पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही इथे आज सकाळी ही घटना घडली.बोलेरो आणि ट्रकच्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत.

बोलेरो गाडीला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन महिलांसह एका बालकाचा समावेश आहे. सर्व मृत निवडुंगवाडी इथले रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.