सेनेला कोंडित पकडण्यासाठी भाजपने आखलाय मोठा प्लॅन

0
621

महाराष्ट्र ,दि.११ (पीसीबी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना मोठा वेग आला आहे.

राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ दिल्लीत शिवसेनेचे सचिव अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. काँग्रेसची चार वाजता राज्यातील नेत्यांसोबत महत्वाची बैठक आहे. त्यापूर्वीच देसाई आणि नार्वेकर यांनी काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. .
दरम्यान, सेनेला कोंडित पकडण्यासाठी भाजपने मोठा प्लॅन आखला आहे. शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची असलेली मुंबई महानगरपालिकेतला पाठिंबा भाजप काढून घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपने आज संध्याकाळी 7 वाजता कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. या कोअर कमिटीच्या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.