बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी १०० कोटींच्या निधीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

0
683

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी १०० कोटींच्या निधीला  आज (मंगळवार)  झालेल्या राज्य  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  स्मारकाचे बांधकाम एमएमआरडीए करणार आहे. सुरुवातीला खर्च एमएमआरडीए करणार आहे. त्या नंतर सरकार तो खर्च देणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांची बुधवारी (दि. २३) जयंती आहे. यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबातील इतर सदस्य तसेच शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गणेश पुजनाने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन  करण्यात येणार आहे. तसेच  महापौर बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भूमिगत  स्मारक बांधले जाणार आहे. महापौर बंगल्याची २३०० स्क्वेअर फुटाची जागा  बाळासाहेबांच्या स्मारकासाठी  अपुरी पडत आहे. त्यामुळे बंगल्याच्या मागच्या आणि पुढच्या जागेचाही स्मारकासाठी वापर करण्यात येणार आहे.