बांधकाम साइटवरून 75 हजारांची वायर चोरीला

0
422

देहूरोड, दि. १६ (पीसीबी) – देहूरोड येथे लिटील अर्थसाईट मासुळकर सिटी या बांधकाम साईटवरील एका फ्लॅट मधून अज्ञात चोरट्यांनी 75 हजार रुपये किमतीची वायर चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 14) सकाळी घडली.

सतीश दिगंबर जोशी (वय 46, रा. वडगाव बुद्रुक) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथे लिटील अर्थसाईट मासुळकर सिटी या बांधकाम साईटचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास अनोळखी चोरट्याने बांधकाम साईट वरील एका फ्लॅटच्या शौचालयाच्या खिडकीतून आत प्रवेश केला. चोरट्याने बांधकाम साइटवरून 75 हजार रुपये किमतीची कॉपर वायर व पॉलीकॅब वायर चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.