अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

0
544

निगडी, दि. १६ (पीसीबी) – अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने उघडकीस आला. मधुकर गोरे (वय 21 रा. सिद्धिविनायक नगरी, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना जानेवारी 2021 ते 15 जुलै 2021 या कालावधीत निगडी आणि परिसरातील लॉजवर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपीने मुलीसोबत वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.