बर्डफ्लूचे संकट; ‘या’ प्राणिसंग्रहालयाच्या सर्व पक्ष्यांना ठार मारण्याचे आदेश

0
212

उत्तर प्रदेश,दि.१०(पीसीबी) – उत्तर प्रदेशात बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. लखनऊ प्राणिसंग्रहालयाच्या पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू विषाणू आढळल्यानंतर प्राणीसंग्रहालयाचा पक्षी विभाग बंद करण्यात आला आहे. लोकांना बर्ड हाऊसवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रशासनाने कानपूर प्राणिसंग्रहालयात घराच्या सर्व पक्ष्यांना ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. येथील काही पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणूही आढळून आले आहेत. सध्या कानपूर प्राणीसंग्रहालयात बर्डफ्लू आढळल्याचे स्पष्ट झाले आहे.

कानपूर प्राणिसंग्रहालयात चार पक्ष्यांच्या मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या तपासणीत अहवालात बर्ड फ्लू विषाणू आढळून आला आहे. कानपूर आयुक्त राजशेखर यांच्या आदेशानुसार प्राणीसंग्रहालयाच्या सभोवतालचा परिसर रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. प्रशासन आणि रहिवासी सर्व इथं सावध झाले आहेत.

सर्व पक्ष्यांना ठार मारण्याचे आदेश
या शिवाय इतर शेतातील पक्षी मारण्याचे आदेश प्राणीसंग्रहालयाला प्रशासनाने दिले आहेत. दोन दिवसात या प्राणीसंग्रहालयात दहा पक्ष्यांचा मृत्यू झाला, त्यापैकी चार पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तेथून आलेल्या अहवालात चारही पक्ष्यांमध्ये बर्डफ्लू विषाणू आढळून आला आहे.