पोलिसांचा धाकच उरला नाही; पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन चोरीचे सत्र सुरूच

0
309

पिंपरी, दि.१० (पीसीबी) – पिंपरी चिंचवडचे पोलिसांनी दारु, मटका, जुगार, हुक्का पार्लर आदी अवैध धंदे आटोक्यात आणले, परंतु वाहन चोरीवर आजही नियंत्रण आणता आलेले नाही. शहरातील वाहन चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेईनात. आणखी पाच वाहन चोरीच्या घटना उकडकीस आल्या आहेत. यात भोसरी, मोशी, चाकण मधून चार दुचाकी चोरीला गेल्या आहेत. तर निगडी मधून चोरट्यांनी कार चोरून नेली आहे. याबाबत शनिवारी (दि. 9) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संतोष बबन बढे (वय 39, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांची 10 हजारांची युनिकॉर्न दुचाकी अज्ञात चोरट्यांनी 4 जानेवारी रोजी रात्री आठ ते दहा वाजताच्या सुमारास चक्रपाणी वसाहत येथील संगम गाडी कारखान्यासमोरून चोरून नेली. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमाराम ताराराम सीरवी (वय 35, रा. कर्वेनगर, पुणे) यांची 20 हजारांची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (एम एच 12 / एच डब्ल्यू 8651) अज्ञात चोरट्यांनी मोशी येथील स्पाईन सिटी मॉल समोरून चोरून नेली. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित श्याम भंगे (वय 22, रा. बालाजीनगर, चाकण) आणि भुजंग मद्दु पुजारी (वय 60, रा. महाळुंगे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भंगे यांची 40 हजारांची पल्सर दुचाकी (एम एच 14 / जे एफ 1021) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे. तर पुजारी यांची 80 हजारांची बुलेट (एम एच 14 / एफ ए 4587) अज्ञात चोरट्यांनी खराबवाडी येथून चोरून नेली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

जुबेर अब्दुल रज्जाक शेख (वय 33, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात कार चोरी बाबत फिर्याद दिली आहे. शेख यांची 50 हजारांची स्विफ्ट गाडी (एम एच 12 / डी ई 5079) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या समोरील रोडवरून चोरून नेली. हा प्रकार शनिवारी (दि. 9) पहाटे तीन ते सव्वातीन या कालावधीत घडली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.