बकरी ईदनिमितत् फ्लॅटमध्ये कुर्बानी देण्यास उच्च न्यायलयाची मनाई

0
416

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – बकरी ईदनिमितत् फ्लॅटमध्ये कुर्बानी देण्यास उच्च न्यायलयाने मनाई केली आहे. यामुळे मुंबई पालिकेकडे आलेले सुमारे ८ हजार परवाने रद्द होणार आहे. उच्च न्यायालयाने मनाई करताना समुदायिक केंद्रात कुर्बानीची सोय असलेल्या ठिकाणी एक किलोमीटरच्या परिसरात कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला स्वतंत्र परवानगी देऊ नका असे, आपल्या आदेशात म्हटले आहे.

बकरी ईदसाठी कत्तलखान्याबाहेर तसंच खासगी जागांसाठी देण्यात आलेल्या परवान्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल कऱण्यात आली होती. यावेळी उच्च न्यायालयाने बकरी ईदनिमित्त फ्लॅटमध्ये कुर्बानी देण्यास मनाई केली आहे. यामुळे मुंबई पालिकेकडे आलेले सुमारे ८ हजार परवाने रद्द होणार आहेत. उच्च न्यायालयाने मनाई करताना समुदायिक केंद्रात कुर्बानीची सोय असलेल्या ठिकाणी एक किलोमीटरच्या परिसरात कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला स्वतंत्र परवानगी देऊ नका असे आपल्या आदेशात म्हटले आहे.