धक्कादायक: मुंबईच्या महापौरांनी नागरिकांसमोर महिलेचा हात मुरगाळला

0
430

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एका महिलेशी वाद घालत तिचा हात मुरगळ्याचा धक्कादायक व्हीडिओ समोर आला आहे.

महाडेश्वर यांच्या मतदारसंघात झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर मृतांच्या घरी जाण्यापूर्वी स्थानिकांनी महापौरांना अडवले असल्याचे व्हीडिओमध्ये दिसत आहे. या दरम्यान स्थानिक महिलांनी पोलिसांसमोर गोंधळ घालत महाडेश्वरांना अडवले. मात्र महाडेश्वर यांनी तू मला ओळखत नाही. दादागिरी करायची नाही, अशी भाषा वापरत त्या महिलेचाच हात मुरगळला.

दरम्यान, या घटनेचा व्हीडिओ काँग्रेसचे आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत निषेध व्यक्त केला आहे.