मी फक्त डिफेन्सचा टॅब सांगितला तर, पाणबुडी गडगडली

0
41
  • रेल्वेला वायफाय सेवा कोण पुरवता, मग शिरूरमध्ये रेल्वे आहे का?

शिरुर : महाविकास आघाडीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज पुन्हा प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लोकसभेतल्या कामकाजाची पोलखोल करत आणखी पुरावे सादर केले.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ  शिरुर मध्ये जेष्ठ नेते मा. शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा शिरूरच्या पाच कंदील चौकात पार पडली. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, प्रवीण गायकवाड, अंकुश काकडे, आमदार अशोकबापू पवार, आ. रोहित पवार, उत्तमराव जानकर, नितेश कराळे, सुजताभाभी पवार, काकासाहेब पलांडे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, देवदत्त निकम, सुरेश भोर आदी उपस्थित होते.

ओतूरच्या सभेत डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संरक्षण खात्याविषयी विचारलेल्या प्रश्नांची पोलखोल केली होती. त्यावर आढळराव पाटलांनी पुरावे देण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान स्वीकारत डॉ. कोल्हे हे आढळराव पाटलांनी विचारलेल्या प्रश्नांचे पुरावे सादर करत आहेत.

त्यातच, आढळराव पाटलांच्या चिरंजीवाने हे आरोप फेटाळून लावत एक व्हिडिओ प्रसारित केला. त्याचाच आधार घेत डॉ. कोल्हे यांनी रेल्वे संबंधी विचारलेल्या प्रश्नांचे पुरावे जाहीर सभेत सादर केले. याच भागात येऊन रामलिंग महाराजांची खोटी शपथ कोणी घेईल असं वाटलं नव्हतं. माझा काहीही संबंध नाही असं सांगता आणि दुसरीकडे मग कशाला पोराला व्हिडीओ करायला लावल, असा सवाल त्यांनी केला. मायबाप मतदारांनी निवडून दिल्यावर कंपनीचे साटलोट करता त्याच उत्तर द्या, असं आव्हान ही दिल.

29 जुलै 2010 ला प्रश्न विचारला आहे, रेल्वेत इंटरनेट सुविधा कधी सुरू होणार याची माहिती द्या, आता शिरुर मध्ये रेल्वे आहे का हो, असा सवाल करत मी डिफेन्सचा टॅब सांगितला तर कशी उरुळी कांचन मध्ये पाणबुडी गडगडली असा टोला कोल्हे यांनी लगावला. लोकप्रतिनिधीचा बुरखा घालून जे व्यापार करतात, अश्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येणाऱ्या नेत्यांनी उत्तर द्यावे, असं जाहीर आव्हान ही डॉ. कोल्हे यांनी दिल.

मराठा क्रांती मोर्चाचे नेते अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांनी आज डॉ. कोल्हे यांना जाहीर पाठींबा दिला. वाडेकर म्हणाले की, भाजपने मराठा समाजाची जी फसवणूक केली. त्या भाजपला जागा दाखवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, माझ्या उमेदवारीचा कोणाला फायदा होऊ नये, म्हणून बिनाशर्त पाठींबा देत आहे.