प्लास्टिक वाईटच, पण प्लास्टिक बाटलीने कॅन्सर होण्याचे पुरावे नाहीत

0
558
Many empty blue and green water bottles. Shallow DOF.

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – पिण्याच्या पाण्यात मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण वाढ आहे, पण प्लास्टिकच्या बाटलीत पाणी प्यायल्याने कर्करोग होतो, याबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट पुरावे मिळालेले नाहीत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जारी केलेल्या अहवालात असे म्हटले की प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करायला हवा.

प्लास्टिक पर्यावरणात पसरून कशाप्रकारे शरीराचे नुकसान करते ते समजण्यासाठी आणखी संशोधनाची गरज असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे. मायक्रोप्लास्टिकची कोणतीही निश्चित परिभाषा नाही, पण WHO नुसार, मायक्रोप्लास्टिकचे खूप लहान अंश किंवा तंतू असतात, त्यांचा आकार सामान्यत: मिमी पेक्षा कमी असतो. मात्र पिण्याच्या पाण्यात हे कण १ मि.मी. इतके लहान असू शकतात. वास्तवात १ मि.मी. हून लहान कणांना नॅनोप्लास्किट म्हटले जाते.

रिपोर्टनुसार, १५० मायक्रोमीटरएवढे मोठ्या आकाराचे मायक्रोप्लास्टिक्स माणसाच्या शरीरात जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, याउलट नॅनो आकाराचं प्लास्टिक आणि खूप लहान मायक्रोप्लास्टिक कण शरीरात जाण्याची शक्यता अधिक आहे, पण शरीराला नुकसान होईल इतक्या प्रमाणात हे कण शरिरात जाण्याची शक्यता नाही.