प्रियकराशी झालेल्या भांडणावरून विवाहितेची आत्महत्या; पतीची पोलिसात धाव

0
324

देहूरोड, दि. ८ (पीसीबी) – प्रियकरासोबत भांडण झाल्याने विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पतीने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला असून पत्नीच्या प्रियकरासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार देहूरोड परिसरात घडला आहे.

याप्रकरणी 40 वर्षीय पतीने मंगळवारी (दि. 7) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रियकर आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका महिलेलाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 26 वर्षीय पत्नीचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते. आरोपी प्रियकरासोबत फिर्यादी यांच्या पत्नीचे भांडण झाले. आरोपीने फिर्यादी यांच्या पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली. त्या कारणावरून पत्नीने राहत्या घरात बेडरूम मधील छताच्या फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 28 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.