प्रियंका गांधी चोराच्या पत्नी; उमा भारतींचे वादग्रस्त विधान  

0
410

भोपाळ,  दि. १७ (पीसीबी) – काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी चोराच्या पत्नी आहेत, संपूर्ण भारत त्यांना या नजरेतून पाहत आहे, असे वादग्रस्त विधान केंद्रीय जलसंसाधन मंत्री आणि  भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी केले आहे.  

छत्तीसगडमधील दुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी उमा भारती आल्या होत्या.  यावेळी त्या  माध्यमांशी बोलत होत्या.

यावेळी त्यांनी  प्रियांका गांधी यांच्या राजकीय प्रवेश तसेच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांबाबत   भारती म्हणाल्या की,  त्यांच्या पतीवर चोरीचा आरोप आहे, त्यामुळे चोराच्या पत्नीकडे ज्या नजरेने पाहिले जाते, त्याचप्रकारे  भारत  प्रियांका गांधीकडे पाहणार आहे.

प्रियांका गांधी वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात  निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावर  उमा भारती म्हणाल्या की,  भारतात लोकशाही आहे. त्यामुळे  कोणत्याही इच्छूक उमेदवाराला कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे.