तामिळनाडूच्या वेल्लोर मतदारसंघाची निवडणूक रद्द; नोटांच्या बदल्यात मत प्रकरण

0
564

वेल्लोर, दि. १७ (पीसीबी) – निवडणूक आयोगाने तामिळनाडूच्या वेल्लोर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द केली आहे. येथे १ एप्रिलला द्रमुक उमेदवाराच्या सिमेंटच्या गोदामातून ११ कोटी रुपये जप्त केले होते. यानंतर निवडणूक आयोगाने वेल्लोरची निवडणूक रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती. कायदा मंत्रालयाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी मंगळवारी सायंकाळी वेल्लोर मतदारसंघाची निवडणूक रद्द करण्यास मंजुरी दिली.

वेल्लोर या निवडणुकीत पहिला असा मतदारसंघ आहे, जिथे नोटांच्या बदल्यात मत प्रकरणात निवडणूक रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, प्राप्तिकर विभागाने रात्री तुतीकोरीनमध्ये द्रमुकच्या राज्यसभा सदस्य कनिमोझी यांच्या घर व कार्यालयावर छापे टाकले. द्रमुक प्रमुख स्टॅलिन यांनी ही कारवाई म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे.